ओळखा पाहू या बाईकस?


पाहताक्षणी विदेशी असाव्यात असा भास निर्माण करणार्‍या रॉयल एनफिल्डच्या दोन शानदार बाईक्स फ्रान्स २०१७ व्हील्स अॅन्ड व्हेव्हज फेस्टीव्हलमध्ये सादर करण्यात आल्या असून त्या ग्राहकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. रॉयल एनफिल्डच्या हिमालयन व काँन्टिनेन्टल या बाईक्सना यूकेच्या सिनरोजा मोटरसायकल्स कंपनीने अशा प्रकारे कस्टमाईज केले आहे की त्यांची खरी ओळख पटणे अवघड बनले आहे. रॉयल एनफिल्डने या कंपनीशी कोलॅबरेशन केलेले आहे. त्यानुसार हिमालयनला जंटलमॅन ब्रॅट म्हणून तर काँटीनेन्टलला सर्फ रेसर लूक दिला गेला आहे.


हिमालयनला १६ इंची स्पोक रिम व रूंद टायर्स व ग्रे रंगाने वेगळाच लूक आला आहे. त्याचे सस्पेन्शन अधिक मजबूत केले गेले आहे व लेदर वर्क व मशीन्ड अॅल्युमिनियमच्या वापरामुळे ती वेगळीच बाईक वाटते आहे.टेल माउंटेड एक्झॉस्ट, ५ स्पीड गिअरबॉक्स, ४११ सीसी इंजिन अशी तिची अन्य फिचर्स आहेत. गोल हेडलाईट व इंडिकेटर्स दिले गेले असून फ्रेम थोडी छोटी केली गेली आहे. सीट कस्टम बिल्ट आहे.

काँटीनेंटल जीटीला १७ इंची रिम, अपसाईड डाऊन फ्रंट फोर्क, इंजिनाजवळ रियर मोनोशॉक सस्पेन्शन ५३५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन, हायकंप्रेशनसाठी मशीन्ड पिस्टन लावला गेला आहे. जेट स्टाईल टेल एक्झॉस्ट व ब्राऊन लेदर कस्टममेड सीटमुळे ती अधिकच देखणी वाटते आहे

Leave a Comment