एअर इंडिया घडवणार ७०६ रूपयांत हवाई सफर


नवी दिल्ली: एअर इंडियाने स्पाईसजेट आणि इंडिगोनंतर आता आपली मॉन्सून स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. एअर इंडियाच्या तिकीटांचे दर मॉन्सून स्पेशल ऑफरनुसार ७०६ रूपयांपासून आहेत. तुम्हाला या ‘श्रावण स्पेशल’ सेल अंतर्गत १७ जून ते २१ जून दरम्यान विमान तिकीट बूक करावे लागेल. ही ऑफर १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यान प्रवास करणा-यांसाठीच आहे.

याची माहिती एअर इंडियाने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आणि वेबसाईटवर दिली असून एअर इंडिया मान्सून सेलच्या बाबतीत इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. या ऑफरचे तिकीट तुम्ही एअर इंडिया बुकींग ऑफिस, वेबसाईट, अ‍ॅप आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंटकडून बुक करू शकता. ही ऑफर डोमेस्टिक नेटवर्कच्या काही मोजक्याच सेक्स्टरसाठी आहे.

Leave a Comment