इस्रोच्या मंगळयानाला एक हजार दिवस पूर्ण


नवी दिल्ली : आज भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण झाले असून मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे. फक्त १८० दिवसांकरता मंगळयान मोहिमेचे मंगळ ग्रहाभोवती नियोजन केले गेले होते. मात्र प्रत्यक्षात १००० दिवस मंगळयान कार्यरत राहिले आहे. इस्त्रोने ५ नोव्हेंबर २०१३ला पृथ्वीवरुन मंगळयान प्रक्षेपित केले होते. तब्बल १० महिने प्रवास करत ६८ कोटी किलोमीटर अंतर पार करत मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ला मंगळयान ग्रहाच्या कक्षेत यशस्वरित्या स्थिरावले होते. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी कऱणारा भारत हा पहिला देश ठरला होता. सध्या मंगळयान मंगळग्रहाभोवती सुमारे ४७१ किमी ते ७६ हजार ९९० किमी अशा दीर्घ वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करत आहे. गेल्या एक हजार दिवसांत मंगळयानाने मंगळग्रहाचा विस्तृत नकाशा तयार केला असून खनिजांबद्दलही माहिती मिळवली आहे.

Leave a Comment