अमेझॉनच्या मालकाला पडला अजब प्रश्न; मागतो आहे तुमचा सल्ला


मुंबई : आपली संपत्ती दान करण्याची इच्छा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी एक असलेले जेफ बेजोस यांना आहे. पण, त्यांना सध्या ही संपत्ती कुठे दान करावी? असा प्रश्न पडला आहे.

त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. ‘ट्विटर’वर त्यांनी आपली अब्जावधींची संपत्ती कुठे दान करू? असा प्रश्नच त्यांनी मांडला आहे. जवळपास ५.३ लाख करोड रुपयांची संपत्ती बेजोस यांच्या नावावर आहे. मला आता लोकांची मदत करण्याची इच्छा आहे. अशी मदत ज्याची गरज तात्काळ आणि खोल परिणाम असेल, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ट्विटला रिप्लाय करून तुमची कल्पना नक्की कळवा, असे म्हणत त्यांनी ट्विटरवासियांकडे मदतही मागितली आहे.

यानंतर, त्यांच्या या ट्विटला २४ तासांच्या आता त्यांना १५,००० हून अधिक रिप्लाय मिळाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, जेफ दरवर्षी आपल्या संपत्तीचा काही हिस्सा दान करतात. त्यांच्या आई-वडिलांनी स्थापन केलेल्या एका फाउंडेशनला ते मदत करतात तसेच एका कँसर सेंटरलाही त्यांनी ४० मिलियन डॉलर दान म्हणून दिले आहेत. जगभरातील १६७ लोकांनी आपल्या एकूण संपत्तीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेटस यांच्यासोबत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश आहे.

Leave a Comment