कार निर्यातीत फोर्डच नंबर १


नवी दिल्ली – फोर्ड इंडियासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली झाली असून कंपनी या वर्षात देशातील सर्वात मोठी कार निर्यातदार बनली आहे. फोर्ड इंडियाने गेल्या सलग चार महिन्यात निर्यातीमध्ये हय़ुंदाईला मागे टाकले आहे. सियाम या संघटनेच्या आकडेवारीनुसार, फोर्ड इंडियाने मे २०१७मध्ये १६,७६१ युनिट्सची निर्यात केली. महिन्याच्या आधारे कंपनीच्या निर्यातीत घसरण झाली आहे, मात्र यानंतरही कंपनी हय़ुंदाईच्या पुढे आहे.

फोर्ड इंडियाची देशातील वाहन क्षेत्रापेक्षा वाढ वेगाने होत आहे. भारतीय बाजारपेठेबरोबरच निर्यातीवरही कंपनीचे लक्ष्य आहे. मजबूत ब्रॅन्ड, योग्य उत्पादन, स्पर्धात्मक किंमत आणि योग्य दर्जा यामुळे भारतात स्थिर आणि नफा कमविणारा व्यवसाय बनण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. भारतात फोर्ड इकोस्पोर्ट, फिगो आणि अस्पायर या कारना चांगली मागणी असल्याचे फोर्ड इंडियाचे अनुराग मल्होत्रा यांनी म्हटले. गेल्या वर्षात १.३७ लाख युनिट्सची निर्यात फोर्ड इंडियाने केली होती. कंपनीच्या निर्यातीत ३९.२ टक्क्यांनी वाढ झाली.

Leave a Comment