कराचीमध्ये पिझ्झा बॉय झाला विराट; व्हिडीओ व्हायरल


भारतीय क्रिकेट प्रेमीच्या गळ्यातला सध्याचा ताईत म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली. पण विराटचे चाहते जेवढेच भारतात आहेत तेवढेच चाहते जगभरातही आहेत. त्यात पाकिस्तानही मागे नाही. पाकिस्तानाकडे विराटसारखा कोणी खेळाडू नाही,जो त्याला टक्कर देईल. पण त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा कोहली मात्र त्यांच्याकडे आहे.

हुबेहूब कोहलीसारखा दिसणारा हा तरुण काही क्रिकेटपटू नाही. तर कराचीमधील शहीद-ए-मिलातच्या एका पिझ्झा दुकानात काम करतो. हा व्हिडीओ फेसबुकवर ‘just pakistani thing ‘ ने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही गोंधळात पडाल की हा विराट कोहली तर नाही.

Leave a Comment