शताब्दीच्या प्रवास भाड्यात घट


मुंबई : भारतीय रेल्वेने महागड्या एअरलाइन्सना कडी टक्कर देत असतानाच रस्ते वाहतुकीलाही टक्कर देण्याचा निर्णय घेतला असून यातच शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात तब्बल ३० टक्के घट करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

सध्या शताब्दी एक्स्प्रेसने कमी अंतरावर धावणाऱ्या मार्गांचा रेल्वेने अभ्यास केला असून शताब्दी एक्स्प्रेसचे या मार्गांवरील भाडे कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ३० टक्क्यांची घट शताब्दी एक्स्प्रेसच्या भाड्यात करण्यात येणार असल्याने रेल्वेचे भाडे वॉल्वो बस किंवा अन्य एसी बसच्या तुलनेतही कमी होण्याची शक्यता आहे. दोन शताब्दी एक्स्प्रेसमध्ये रेल्वेने प्रायोगिक तत्वावर तिकीट दरांमध्ये ३० टक्के कपात केली होती. यात रेल्वेला मोठा फायदा झाल्यामुळे आता पुढील महिन्यापासूनच रेल्वे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment