जुलैपासून मिळणार ७व्या वेतन आयोगाचा लाभ!


नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचा-यांना आगामी १८ जुलैपासून सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींचा लाभ मिळण्याची शक्यता असून म्हणजेच सातवा वेतन आयोग जुलैपासून लागू होण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय कर्मचा-यांना घरभाडे भत्त्यांसोबत जुलै महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारद्वारे कर्मचा-यांना भत्ते न दिल्याने सरकारी खजिन्यात प्रत्येक महिन्याला तब्बल २ हजार २०० कोटींचा फायदा झाला आहे. म्हणजेच हे भत्ते न दिल्याने केंद्र सरकारने १ जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत ४० हजार कोटींची बचत केली आहे. पण, सरकार केंद्रीय कर्मचा-यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देऊ शकते.

सुत्रांच्या माहितीनुसार, ५० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात घरभाडे हे मूळ वेतनाच्या २७ टक्के दिले जाण्याची शक्यता आहे. तर सातव्या वेतन आयोगाने घरभाडे भत्ता २४ टक्के करण्यात येण्याची शिफारस केली होती. सध्या या शहरांमध्ये घरभाडे मूळ वेतनाच्या ३० टक्के एवढा आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मूळ वेतनात २३.५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच सातवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या भत्त्यांसंदर्भात या महिन्यात होणा-या कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment