यंदा भारतातून सीफूड निर्यातीत भरीव वाढ


यंदाच्या वर्षात भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात होणार्‍या सीफूड मध्ये भरीव वाढ झाली आहे. फ्रोझन झिंगे आणि फ्रोजन मासे यांना आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी असून २०१६-१७ मधली ही सर्वाधिक निर्यात आहे. यंदा ११.३४ लाख मेट्रीक टन निर्यात झाली असून गतवर्षी हेच प्रमाण ९.४५ लाख मे.टन होते. यंदाच्या निर्यातीतून भारताला ३७८७०.९० कोटी रूपये मिळाले आहेत व भारत अमेरिका व पूर्व आशियाई देशांना सर्वाधिक निर्यात करणार्‍या देशांत सामील झाला आहे. युरोपिय संघाकडूनही भारतीय सीफूडला वाढती मागणी आहे.

वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रोझन झिग्यांच्या निर्यातीत चीन अव्वल आहे मात्र अमेरिका व सर्वात मोठा सीफूड बाजार मानल्या जाणार्‍या दक्षिण पूर्व आशियाई देशांत भारताची निर्यात वाढली आहे. अमेरिकेला १.८८ लाख मे.टनांची निर्यात झाली आहे. वाढत्या निर्यातीमागे माशांच्या विविध जातींचे वाढलेले प्रमाण व त्यांच्या गुणवत्तेत जाणीवपूर्वक करण्यात आलेले प्रयत्न यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment