प्रेमासाठी कायपण… चक्क रेल्वे स्टेशनशी लग्न


कॅलिफोर्निया : असे म्हणतात ना प्रेम आंधळे असते. पण अशीच काही घटना कॅलिफोर्निया मध्ये घडली आहे. येथील एक महिला रेल्वे स्टेशनच्या प्रेमात ऐवढी बुडाली आहे की तिने चक्क त्या रेल्वे स्टेशनशीच लग्न केले आहे. ‘सेंटा फे’ असे या रेल्वे स्टेशनचे नाव असून हा जगावेगळा कारनामा करणा-या महिलेचे नाव ‘कॅरोल’ असे आहे.

कॅरोल ही सध्या ४५ वर्षांची असून जेव्हा ती नऊ वर्षाची होती तेव्हापासून या रेल्वे स्टेशनच्या प्रेमात ती पडली आहे. ती म्हणते की मी या स्टेशनवर गेल्या ३६ वर्षांपासून अविरत प्रेम करत आले आहे. मी या प्रेमाखातर रेल्वेस्टेशनशीच विवाह केला. न चुकता रोज कॅरोल ही या रेल्वेस्टेशनला भेटण्यास येते. या ‘सेंटा फे’ स्टेशनला ‘दैद्रा’ अशी प्रेमाने हाकही मारते. या स्टेशनला पतीचाच दर्जा दिल्याने कॅरोलने आपले नाव ‘कॅरोल सेंटा फे’ असे बदलून घेतले आहे.

कॅरोल ही रोज ४५ मिनिटांचा प्रवास करून ‘सेंटा फे’ स्थानकावर येते. तेथे पोहोचताच ती रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर प्रेमाने हात फिरवते आणि चुंबनही घेते. यासंदर्भात कॅरोल म्हणते की, आजपर्यंत मला ‘सेंटा फे’ स्थानकाने कधीही धोका दिलेला नाही आणि पुढेही देणार नाही. तसेच मला सोडूनही जाणार नाही, याची मला कल्पना आहे.

याआधी कॅरोल कुणाशी रिलेशनशिपमध्ये नव्हती असे नाही. ती या आधी टॉम नावाच्या एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण टॉमकडून तिला धोका मिळाल्यामुळे १८ महिन्यांनतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कॅरोलने रेल्वे स्टेशनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे करणारी कॅरोल काही पहिली महिला नाही. यापूर्वी २००७मध्ये एरिका एफेलने फ्रान्सच्या आयफेल टॉवरशी विवाह केला होता.

Leave a Comment