जन्माच्या दुसऱ्या मिनिटातच चालू लागले हे बाळ


नवी दिल्ली – जन्मल्यावर जवळपास ८ ते ९ महिन्यानंतर बाळाचे पहिले पाऊल पडते. ते त्यावेळी गुडघ्याच्या साहाय्याने चालण्याचा प्रयत्न करते आणि ते त्यानंतर हळूहळू आपल्या पायावर चालू लागतात. पण, जन्माच्या दुसऱ्या मिनिटाला नवजात बालक चालू लागल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून ज्यात एक नवजात बाळ आपल्या जन्मानंतरच्या काही मिनिटातच चालताना दिसत आहे. सर्वसाधारणपणे जन्मानंतर बाळाला चालण्यासाठी ९ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो. पण, हे बाळ जन्मताच चालू लागले आहे. व्हिडिओमध्ये डॉक्टरने नवजात बाळाला आपल्या हातांनी उचलल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे ते बाळ आपले पाऊल पुढे टाकतानाही दिसते. हे बाळ आपल्या आईच्या गर्भातून निघल्यानंतर ऑपरेशन रूममध्येच चालू लागले. या व्हिडिओला पाहून डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. या व्हिडिओला Arlete Arantes नावाच्या फेसबुक पेजवर २६ मे रोजी अपलोड करण्यात आले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला कोट्यवधी लोकांनी पाहिले आहे.

Leave a Comment