झेनचा नवा अॅडमायर सेंस भारतात लाँच


झेन मोबाईल्सने त्यांचा नवा अॅडमायर सेंस हा बजेट फोन भारतात लाँच केला असून त्याची किंमत ५९९९ रूपये आहे. स्लीक डिझाईनच्या या फोनची विक्री देशातील सर्व वितरकांकडे सुरू आहे. निकी ए वन अॅप्लीकेशनसह असलेल्या या फोनला बॅकसाईडला फिंगरप्रिंट सेन्सरही दिला गेला आहे. निळा आणि शँपेन गोल्ड रंगात हा फोन उपलब्ध आहे.

अन्य फिचर्समध्ये ५ इंची एफडब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले,१ जीबी रॅम, ८जीबी इंटरनल मेमरी, मायक्रोकार्डच्या सहाय्याने ती ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ऑटो फ्लॅशसह ५ एमपीचा रियर व फ्रंट कॅमेरा, ड्यूल सिम, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस यांचा समावेश आहे. हा फोन फोरजी व्होल्टला तसेच वायफाय, जीपीएस, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी पोर्ट सपोर्ट करतो तसेच त्याला हेडजॅक दिला गेला आहे.

Leave a Comment