या डेव्हील्स रस्त्यावरून गायब होतात वाहने


जगभरात अनेक रहस्यमय जागा आहेत. त्यातील कांही वाईट गोष्टींबद्दल कुख्यात असतात. अमेरिकेतील रूट नंबर ६६६ हा रस्ता असाच कुख्यात असून त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.रोड म्हणूनच हा रस्ता ओळखला जातो. ख्रिश्चन धर्माप्रमाणे ६६६ हा आकडा सैतानाच्या मुलाचा आहे व त्यामुळे तो अतिशय अशुभ समजला जातो. मे २०१३ मध्ये या रस्त्याचे नांव बदलून रूट नंबर ४९१ असे केले गेले आहे व तेव्हापासून या रस्त्यावर होणार्‍या अपघातांची तसेच रहस्यमय वाहने बेपत्ता होण्याच्या प्रकारांची संख्याही खूपच घटली असल्याचे सांगितले जाते.

१९३ मैल लांबीचा हा रस्ता १९२६ सालात सुरू झाला. या रस्त्यावर अपघात खूपच प्रमाणात होत होते तसेच १९३० साली या रस्त्यावरून काळ्या रंगाची एक कार अचानक गायब झाली.तिचा शोध कधीच लागला नाही. मात्र तेव्हापासून ही सैतानी कार मधूनच दिसत असे व त्यानंतर या रस्त्यावर कार्स, ट्रक्स अपघातग्रस्त होत असत. तसेच या रस्त्यावरून एक महिला फिरताना दिसते व तिने कारमध्ये लिफ्ट मागितली की ती कार रस्त्यावरून गायब होते व कांही मैल गेल्यावर ही कार पुन्हा दिसू लागते. मधल्या काळात काय घडले याची काहीही माहिती कारमधील लोक सांगू शकत नाहीत असाही अनुभव सांगितला जातो.अखेर गावच्या महापौरांनी लोकांच्या मागणीवरून या रस्त्याला ४९१ नंबर दिला आहे. हा रस्ता न्यू मेक्सिको, कोलोरॅडो व अॅरिझोना राज्यांना जोडतो.

Leave a Comment