तब्बल ४० दिवस वीज पूरवेल एक बटाटा


बटाटा हा सर्व भाज्यांचा राजा मानला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जगभरात सर्वच ठिकाणी बटाट्याचा वापर केला जातो. पण बटाट्याविषयी अशी काही माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. बटाट्याच्या मदतीने तुम्ही मोबाईल फोन चार्ज करु शकता, त्याचबरोबर एक लहानसा बल्बही बटाट्याने चालवू शकता आणि तब्बल ४० दिवस हा बल्ब प्रकाशही देवू शकतो.

आम्ही हा दावा करत नाही, तर संशोधकांच्या एका टीमने हा दावा केला आहे. हा दावा येरुशलमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीचे राबिनोविच यांनी केला असून एलईडी बल्ब एका बटाट्याच्या मदतीने चालू शकतो आणि तोही तब्बल चाळीस दिवसांपर्यंत प्रकाश देऊ शकतो. उकळलेल्या बटाट्याला चार-पाच तुकड्यांत कापा आणि त्यात तांब्याची तार आणि झिंकची प्लेट एकत्र करुन त्याला कनेक्टरच्या मदतीने एलईडी बल्ब जोडा. या प्रयोगानंतर एलईडी बल्ब सुरु होईल. उकळलेल्या बटाट्याने ऊर्जा तब्बल १० पटीने वाढेल म्हणजेच वीज बनविण्याचा खर्च कमी होईल. एका बटाट्याने निर्माण होणारी वीजेसाठी लागलेला खर्च हा विकसनशील देशात वापरण्यात येणा-या तेलापेक्षाही स्वस्त आहे.

ही स्वस्त धातूची प्लेट, तार आणि एलईडी बल्बला जोडून तयार करण्यात येते. संशोधकांचा दावा आहे की, या टेक्निकच्या मदतीने जगभरातील लहान गाव, तसेच शहरांमध्ये वीज उपलब्ध करण्यास खुपच मदत करेल. बटाट्यात असणारी जिंक आणि तांब यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन एक पदार्थाहून दुस-या पदार्थाकडे घेवून जाते त्यामुळे उर्जा निर्माण होते.

३२१४ कोटी टन बटाट्याचे उत्पादन २०१०मध्ये जगात झाले. जगातील १३० देशांमध्ये हे उत्पादन करण्यात आले होते. बटाटा खुप स्वस्त आहे आणि सहजपणे तो साठवून ठेवू शकतो. वीजेपासून जगातील १२० कोटी लोक हे वंचित असून एक बटाटा त्यांच्या घरात वीज पोहचवू शकतो.

Leave a Comment