
रिलायन्स जिओने अनलिमिटेड मोफत इंटरनेट आणि कॉल्सची सेवा देत टेलिकॉम क्षेत्रात अव्वल स्थान पटकावले असून ‘जिओ’ या नावाची जादू लोकांवर किती आहे, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. आता एका पाणीपुरीवाल्याने या ‘जिओ’च्या लाटेचा वापर आपला तोट्यात चालणारा व्यवसाय वाचवण्यासाठी केला तर आश्चर्य वाटायला नको. गुजरातमध्ये रवि जगदंबा नावाचा पाणीपुरीवाला असून आपली पाणीपुरी विकण्यासाठी आता त्याने एकदम बेस्ट शक्कल लढवली आहे. आपल्या पाणीपुरीच्या ठेल्याला त्याने ‘जिओ पाणीपुरी’असे नाव दिले आहे.
तुम्ही खाल्ली आहे ‘जिओ’ची अनलिमिटेड पाणीपुरी
तर ‘रिलायन्स जिओ’च्या ऑफरपासून प्रेरणा घेत रविने आपल्या ग्राहकांना एक ऑफर देऊ केली आहे. शंभर रुपये रविला द्यायचे आणि त्याबदल्यात अनलिमिटेड पाणीपुरी खायची. पण रविने त्याचबरोबर आणखी एक ऑफर आणली असून त्याच्याकडे महिन्याला १००० रुपये भरायचे आणि त्याबदल्यात महिनाभर अनलिमिटेड पाणीपुरी खायची. जिओ पाणीपुरीवाल्याची अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर ऐकून सगळ्यांनी रविच्या ठेल्याबाहेर गर्दी करायाला सुरूवातही केली.
