मायक्रोसॉफ्ट आणणार मॉडर्न की बोर्ड


मायक्रोसॉफटने त्यांच्या लेटेस्ट डेस्कटॉपसाठी ब्ल्यू टूथ की बोर्डवर संशोधन केले असून हा की बोर्ड स्पेशल असेल. म्हणजे त्याच्यावर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. मायक्रोसॉफटने त्याचे नामकरण मॉर्डन की बोर्ड असे केले असून त्यचे कोडनेम आहे सी ३ के १७८०. येत्या २३ मे रोजी शांघाय येथे होत असलेल्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये या कीबोर्डचे प्रात्यक्षिक दिले जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

विंडोज टेन पुशसह हा कीबोर्ड फिट करण्याची कंपनीची योजना आहे. हा कीबोर्ड सरफेस कीबोर्डप्रमाणेच असेल. गतवर्षी सरफेस कीबोर्ड सरफेस स्टुडिओच्या सहकार्याने कंपनीने लाँच केला होता. मॉडर्न की बोर्डमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर न्यूमॅरिक की पॅडच्या आसपास फिट केला जाईल असे सांगितले जात आहे. यामुळे युजरला हार्डवेअर की बोर्ड वापरताना अडचण येणार नाही. या कीबोर्डमध्ये कांही नवी फिचर्सही दिली जातील.

Leave a Comment