अमेझॉनवर नवीन स्मार्टफोन घेतल्यास ४५ जीबी डेटा देणार व्होडाफोन


मुंबई : अमेझॉनवर नवीन ४जी स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांना व्होडाफोनकडून ४५जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. ही ऑफर ११ मे रोजी सुरु करण्यात आली आहे.

व्होडाफोनच्या या नव्या ऑफरनुसार १जीबी किंवा त्यापेक्षा अधिकचा प्लॅन घेतल्यास ९जीबी डेटा दिला जाईल. सलग पाच महिन्यांसाठी ९ जीबी म्हणजे एकूण ४५ जीबी डेटा ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ३० जूनपर्यंत अमेझॉनवर एक्स्क्लुझिव्ह उपलब्ध असणारा ४जी स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.

१जीबी डेटावर ९जीबी डेटा मिळवा, असा मेसेज प्रीपेड ग्राहकांना नव्या स्मार्टफोनमध्ये सिम टाकल्यानंतर येईल. हा ९जीबी डेटा २८ दिवस वापरता येईल. १जीबी प्लॅनच्या रिचार्जनंतर आपोआप ९जीबी डेटा दिला जाईल. पाच वेळा या ऑफरचा फायदा घेता येईल.

Leave a Comment