नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध दूरसंचार कंपनी एअरसेलने आपला नवा प्लॅन लाँच केला असून ग्राहकांना या नव्या प्लॅननुसार अवघ्या ५७ रुपयांत पूर्ण वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा दिली जाणार आहे.
अवघ्या ५७ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग देणार एअरसेल
याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व ग्राहकांसाठी हा प्लॅन फायद्याचा ठरणार आहे. तसेच ९० दिवसानंतर पुढील ३६५ दिवसांसाठी १ पैसा/प्रति सेकंदाच्या दरात मिळणार आहे. मात्र, दिवसातील पहिला कॉल केल्यानंतर अनलिमिटेड कॉलिंग करता येऊ शकणार आहे. याचबरोबर कंपनीच्या या प्लॅननुसार ३० रुपयांचा टॉकटाइमही देण्यात येणार आहे. याची वैधता ६० दिवसांची असणार आहे.