
हाँगकाँगची कंपनी आयटेलने त्याचा नवा मोबाईल आयटेल विश ए ४१ प्लस भारतात लाँच केला असून हा फोर जी व्होल्ट फोन ६५९० रूपयांत उपलब्ध करून दिला गेला आहे. शँपेन आणि मोका अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एक स्मार्ट की दिली गेली असून तिच्या मदतीने फोटो घेणे, कॉल मॅनेज करणे अशी कामे करता येतात.
आयटेल विश ए ४१ प्लस भारतात लाँच
या फोनसाठी ५ इंचाचा एफडब्ल्यूचव्हीजीए डिस्प्ले, २जीबी रॅम, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, ५ एमपीचा ऑटोफोकस व एलईडी फ्लॅशसह बॅक कॅमेरा तसेच ५ एमपीचा फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनची इंटरनल मेमरी १६ जीबी असून मायक्रो कार्डच्या मदतीने ती ३२ जीबी पर्यंत वाढविता येते. फोरजी व्होल्ट बरोबरच ब्ल्यू टूथ, वायफाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी पोर्ट अशी कनेक्टिव्टीव्ही ऑप्शन्स आहेत.फोनसाठी २४००एमएएच बॅटरी दिली गेली आहे.
