देशात 10 स्वदेशी न्यूक्लिअर रिअॅक्टर कार्यान्वित होणार


देशापुढचे वीजेचे संकट सोडविण्यासाठी केंद्र सरकार आखत असलेल्या विविध योजनांमध्ये देशात १० नवीन स्वदेशी न्यूक्लिअर रिअॅक्टर बसविले जाणार असून त्यातून ७ हजार मेगावॉट वीज तयार होणार आहे. या प्रकल्पाला बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे स्वदेशी प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर उभारणे हे भारताच्या न्यूक्लिअर उद्योगाच्या विकासासाठी घेतलेला मोठा निर्णय ठरेल असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

सध्या देशात २२ न्यूक्लिअर रिअॅक्टरमधून ६७६० मेगावॉट वीज तयार होत आहे तसेच कांही रिअॅक्टर उभारणीचे काम सुरू आहे. नवीन रिअॅक्टर राजस्थान, हरियाणा, गुजराथ व मध्यप्रदेशात उभारले जाणार आहेत. यामुळे स्वच्छ उर्जा निर्मितीला मदत होणार आहे.मोदी सरकारच्या कारभाराला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशात स्वदेशी प्लांटचे काम सुरू होत असून २०२१-२२ पर्यंत ६७०० मेगावॉट वीजेची भर पडणार आहे. या प्रकल्पासाठी ७० हजार कोटी रूपये खर्च येणार असून त्यातून ३३,४०० रोजगार निर्माण होणार आहेत.

Leave a Comment