आता घरबसल्या सुधारा आधार, पॅनकार्डच्या चुका !


नवी दिल्ली : आधारकार्ड, पॅनकार्डवरील नावासंबंधीच्या काही चुका सुधारण्यासाठी सध्या ब-याचदा फॉर्म भरून त्या चुका दुरुस्त केल्या जातात. पण या चुका दुरुस्त करण्यासाठी आता ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. संबंधितांना या प्रणालीच्या माध्यमातून घरबसल्या चुका दुरुस्त करता येणार आहेत.

पॅनकार्ड आणि आधारकार्डवरील नावांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आयकर विभागाने ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीनुसार, ई-फायलिंग वेबसाइटवर बायोमॅट्रिक ओळख आधार आणि पॅनकार्डशी जोडण्याची सुविधेसह एका वेगळ्या हायपरलिंकचा समावेश केला आहे. यामध्ये उपलब्ध असलेला पॅनकार्डच्या माहितीमध्ये बदल करता येऊ शकतो. तसेच भारतीय किंवा परदेशी नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. आपल्या पॅन किंवा आधार ओळख क्रमांकाचा वापर करुन ‘आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल’वर लॉग इन करुन येणारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चुका दुरुस्त्या करता येऊ शकतात.