वेस्पाने लाँच केली १५० सीसीची स्कूटर


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी Piaggio ने आपली नवी १५०सीसीची वेस्पाची स्पेशल एडिशनची स्कूटर भारतामध्ये नुकतीच लाँच केली. या नव्या स्कूटरमध्ये अन्य विशेष फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

या स्कूटरमध्ये १२ इंच अलॉय व्हील्स्, टय़ुबलेस टायरसह ऑल राऊंड क्रोम गार्ड किट देण्यात आले आहे. तसेच प्रंट बम्पर गार्डची सुविधा देण्यात आली आहे. १५० सीसी सिंगल सिलिंडर, ११.६ पीएस पॉवर, १०.६ टॉर्क असे फिचर्स देण्यात आले असून या स्कूटरची किंमत ९५ हजार रुपये (पुणे एक्स-शोरुम) ऐवढी आहे.

Leave a Comment