१४ मेपर्यंत सुरु राहणार अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल


मुंबई – देशातील ग्राहकांसाठी ‘ग्रेट इंडियन फेस्टीव्हल’ ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने सुरु केला असून १४ मे पर्यंत हा फेस्टीव्हल सुरु राहणार आहे. ग्राहकांना या सेलच्या माध्यमातून स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही तसेच इतर वस्तुंवर मोठी सूट उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ११ मे पासून सुरु झालेला या सेलचा आजचा दुसरा दिवस आहे.

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हलमध्ये तुम्हाला ६०००० रुपये किंमतीचा आयफोन ७ ३२जीबी हा स्मार्टफोन ऑफरममध्ये ४७,९९९ रुपयांना मिळत आहे. या फोनमध्ये १२ मेगा पिक्सल कॅमेरा, ७ मेगापिक्सल फ्रँट कॅमेरा देण्यात आला असून, ४K व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टम आणि त्यासोबतच २जीबी रॅम, ३२जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

यासोबतच मोटो जी५ तुम्ही १०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकाल. मोटो जी४ प्लस तुम्हाला ११,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर कुलपॅड नोट ५ ३२जीबी तुम्हाला ९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

स्टायलिश गॉगलचे तुम्ही जर शौकिन असाल तर मग तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हलमध्ये Vast UV Sunglasses वर तब्बल ८७ टक्क्यांची सूट मिळत आहे. १०२६ रुपयांचा हा गॉगल तुम्हाला अवघ्या १२९ रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे. पुमा कंपनीच्या स्पोर्टशूजवर ६४ टक्क्यांची सूट उपलब्ध असून ४१९९ रुपयांचे हे शूज अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हलमध्ये केवळ १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

तुम्ही अ‍ॅमेझॉनच्या या फेस्टिव्हलमध्ये सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून खरेदी केली तर तुम्हाला १५% पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. पण यासाठी तुम्हाला अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवरुन खरेदी करावी लागणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरुन तुम्ही खरेदी केल्यास तुम्हाला १०% पर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

Leave a Comment