पाचशेच्या जुन्या नोटाही बनवितील लक्षाधीश


नोटबंदी नंतर पंतप्रधान मोदींनी चलनातून रद्द केल्या गेलेल्या पाचशे व १ हजारच्या नोटा आता केवळ कागद उरले असल्याचे जाहीर केले असले तरी पाचशेच्या जुन्या नोटा लक्षावधी रूपये किंमतीला विकल्या जात आहेत. सरकारने नोटबंदी केल्यानंतर नागरिकांनी जुन्या नोटा मोठया प्रमाणात बँकेत जमा केल्या मात्र तरीही कांही नोटा कांही जणांच्या शिलकीत आहेत. सरकारने त्यानंतर १० पेक्षा जुन्या नोटा बाळगण्यास कायद्याने बंदी केली आहे. त्यामुळे जादा संख्येने नोटा जवळ असणार्‍यांना या नोटा विकून अधिक पैसे कमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ही किमया घडली आहे ईबे वेबसाईटवर लागलेल्या जुन्या नोटांच्या ऑक्शन किंवा लिलावांमुळे. येथे मोठ्या संख्येने पाचशेच्या जुन्या नोटा विक्रीसाठी असून त्यातील कांही ठराविक नंबरच्या नोटांना चांगली किंमत मिळते आहे. ७८६ नंबर असलेल्या नोटेला साडेसात लाख रूपयांची विक्रमी किंमत मिळाली आहे. १२३४, ४२० या आकड्यांच्या नोटांनाही मोठी मागणी असून त्यांच्या किमतीही लाखामध्ये आहेत. या साईटवरून पाचशेच्या नव्या नोटाही विक्रीसाठी आहेत. तेव्हा आपल्या कडे जुन्या नोटा असतील तर त्यांचे नंबर पडताळून तुम्ही लिलावात त्यातून मोठी कमाई करू शकणार आहात.

Leave a Comment