आता रेल्वे तिकिटांची होम डिलिव्हरी


नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने नागरीकांचा रेल्वे प्रवास जास्तीत जास्त सुखकर करण्यासाठी ग्राहकसेवेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असून आता रेल्वेने घरपोच तिकीटांची सुविधा सुरु केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना घरबसल्या तिकीट मिळू शकते.

घरपोच तिकीटांची व्यवस्था आयआरसीटीसीने सुरु केली असून, रोकड किंवा अन्य मार्गाने नागरीक तिकीटांचे पेमेंट करु शकतात. ही सुविधा भारतीय रेल्वेच्या कॅटरींग आणि टूरीजम कॉर्पोरेशनने ग्राहक सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने सुरु केली आहे. ज्यामध्ये ग्राहक तिकीट हाती पडल्यानंतरच पेमेंट करु शकतात.

आपली वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून आयआरसीटीसीने पे ऑन डिलिव्हरीची सुविधा सुरु केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. सध्या डिजिटलायझेशनवर भारतीय रेल्वेने भर दिला असून, ऑनलाइन व्यवस्थांच्या माध्यमातून नागरीकांचा त्रास शक्य तितका कमी करण्यावर भर दिला आहे. महसूल वाढवण्यासाठी विविध पर्यायांवर अंमलबजावणी करताना ग्राहकसेवांनाही तितकेच प्राधान्य दिले आहे.

Leave a Comment