११०८ जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जंबो भरती


सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, गृह विभागासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जागा काढल्या असून यात हजार पेक्षा अधिक जागा असून बेरोजगार तरुण तरुणींसाठी ही एक चांगली संधी असून यासाठी २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, तर त्याची अंतिम मुदत ही १६ मे आहे.

सामान्य प्रशासन विभागात सहायक कक्ष अधिकारी पदाच्या २५१ जागांसाठी भरती होणार असून याच्या पूर्व परीक्षेची तारीख १६ जुलै २०१७ तर मुख्य परीक्षा १० डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे.

वित्त विभागात विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी भरती होणार असून याच्या पूर्व परीक्षेची तारीख १६ जुलै २०१७ तर मुख्य परीक्षा ७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.

गृह विभागात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ६५० जागांसाठी भरती होणार असून याच्या पूर्व परीक्षेची तारीख १६ जुलै २०१७ तर मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार आहे. बुधवार दिनांक २६ एप्रिलपासून या सर्व जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १६ मे २०१७ आहे.

Leave a Comment