बजाजने आणली तुमच्या बजेटमधली बाईक


मुंबई – बाईक उत्पादनात आघाडीच्या कंपनींपैकी एक असलेल्या बजाज कंपनीने आपली नवी बाईक सीटी १०० (बीएस४) लाँच केली असून सर्वात महत्वाचे म्हणजे ही बाईक तुमच्या बजेटमधली आहे.

ही बाईक तीन वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असून बजाज सीटी १०० या बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत २९,९८८ रुपयांपासून सुरु होत आहे. बजाजची ही बाईक स्टील व्हील ट्रिम, एलॉय व्हील आणि सीटी १००बी या तीन प्रकारांत लाँच करण्यात आली आहे. बजाज स्टील व्हील ट्रिमची किंमत ३५,३८९ रुपये आहे, एलॉय व्हीलची किंमत ३८,९८१ रुपये आणि सीटी १००बीची किंमत २९,९८८ रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमती दिल्लीतील एक्स शोरुममधील आहेत.

बजाज सीटी १००मध्ये १०.५ लीटर क्षमतेची फ्यूअल टँक देण्यात आली आहे. तसेच यामध्ये ऑटोमॅटिक हेडलँप फिचरही देण्यात आला आहे. ३ इंच रुंद रियर टायरचा वापर करण्यात आला आहे. बजाज सीटी १००बी या बाईकमध्ये कंपनीने ९९.२७ सीसीचा सिंगल सिलिंडर एयर कूल्ड मिल कपल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन ७५०० आरपीएमवर ८.२ पीएसच्या पॉवरवर ४५०० आरपीएमवर ८.०५ एनएमचा टार्क जनरेट करते.

Leave a Comment