सलग १३व्या वर्षी अल्टो ठरली ‘बेस्ट सेलर’ कार


नवी दिल्ली : सलग १३ वर्षे सर्वाधिक विक्री झालेली कार म्हणून अल्टो कारने विक्रम नोंदवला आहे. २०१६-१७ या अर्थिक वर्षात एकूण २ लाख ४१हजार विक्री झालेली अल्टो एकमेक कार ठरली आहे. अल्टोच्या विक्रमी विक्रीचा दावा मारूती-सुझुकी कंपनीने केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मारूती -सुझुकीच्या विपणन आणि विक्री विभागाचे कार्यकारी संचालक आर. एस कलसी यांनी सांगितले , सलग १३ वर्षे विक्रीमध्ये अल्टो अव्वल राहिली आहे. एखाद्या कारच्या लोकप्रियतेचे यापेक्षा मोठो प्रमाण काय असू शकते. सप्टेंबर २०००मध्ये अल्टो कार बाजारात लाँच करण्यात आली होती. एक दशकाहून अधिक काळ या कारचा बाजारात दबदबा राहिला आहे. टू पेडल टेक्नॉलॉजीमध्ये अल्टो कारची किंमत सर्वात कमी आहे. मारूती – सुझुकी कंपनीने २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण १४ लाख ४३ हजारांहून अधिक गाडय़ांची विक्री केली. यामध्ये १७ टक्के विक्री अल्टो कारची आहे. त्याच्यासोबता श्रीलंका, चिली, फिलिफाईन्स आणि ऊरूग्वे यांसारख्या देशांमध्येही २१ हजार अल्टो कारची निर्यात करण्यात आली.

Leave a Comment