आणखी एक धमाका करणार जिओ!


नवी दिल्ली – ट्रायच्या आदेशानंतर ४जी मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा देऊन ग्राहकांना आकर्षिक करणा-या रिलायन्स जिओने समर सरप्राइज ऑफर मागे घेतली आहे. आता त्यानंतर जिओ ग्राहकांसाठी लवकरच नवी जबरदस्त ऑफर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

आम्ही आमचा टेरिफ प्लॉन अपडेट करत आहोत. लवकरच मजेदार ऑफर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत,( We are updating our tariff packs and will be soon introducing more exiciting offers )” असे जिओची वेबसाईट आणि माय जिओ अॅपवर लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ९ एप्रिल(रविवार)पर्यंत ज्यांनी रिचार्ज करून सरप्राइज ऑफर घेतली नाही, अशा ग्राहकांसाठी येणारी नवी ऑफर फायदेशीर ठरणार आहे. तर समर सरप्राइज ऑफरअंतर्गत ९ एप्रिलच्या आधी रिचार्ज केलेल्या ग्राहकांना ३ महिन्यांच्या दिलेल्या मोफत सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र समर सरप्राइज ऑफरचे रिचार्ज केलेल्या ग्राहकांकडून जिओ जुलैनंतर पैसे वसूल करणार आहे.

तत्पूर्वी १५ एप्रिलपर्यंत रिलायन्स जिओने प्राइम मेंबरशिप घेण्याची मुदत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली होती. तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या आदेशानंतर जिओवर ही ऑफर मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. ज्या ग्राहकांनी जिओ समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याआधी प्राइम मेंबरशिप घेतली आहे, अशा ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment