‘जिओ’च्या सेट टॉप बॉक्ससोबत मिळणार ब्रॉडबँड !


मुंबई : ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर मागे घेण्यात आली असली तरी लवकरच जिओकडून नवे सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.

जिओ आता मोबाईल इंटरनेटसोबत सेट टॉप बॉक्स आणि ब्रॉडबँड सेवाही उपलब्ध करून देणार आहे. याची घोषणा लवकरच होऊ शकते. रिलायन्स जिओच्या वेबसाईट रिचार्ज सेक्शनमध्ये पहिल्यांदाच ब्रॉडबॅन्ड आणि डीटीएच सर्व्हिसचाही उल्लेख आहे. जिओ ब्रॉडबॅन्ड सर्व्हिससाठी जिओ फायबरला देशातील अनेक शहरांमध्ये टेस्ट करू शकते. ब्रॉडबॅन्डशिवाय डीटीएच मार्केटमध्येही जिओ एन्ट्री घेऊ शकते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिओ सेट-टॉप बॉक्समध्ये ३६० हून अधिक चॅनल्स ऑफर केले जातील.

Leave a Comment