ट्विटरचे शहेनशहा झाले महानायक


माइक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रशंसकांची संख्या २.६ कोटीहून अधिक झाली असून बॉलिवूडमध्ये शेकडो सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अमिताभने इतर सर्व बॉलिवूड कलाकारांना याबाबतीत पिछाडीवर सोडले आहे.

अमिताभची ट्विटरवरील फॉलोअर्स संख्या शाहरुख खान (२.४ कोटी ) सलमान खान (२.२ कोटी ) आमिर खान (२.० कोटी ) प्रियंका चोपड़ा ( १.६ कोटी ) आणि दीपिका पादुकोण(१.७ कोटी ) यांच्याहून अधिक आहेत. अमिताभ बच्चन पंतप्रधान नरेंद्र मोदीहून ( २.८ कोटी ) थोडेसे पिछाडीवर आहेत. २.६ कोटी प्रशंसकांचा आकडा ट्विटरवर पार केल्यानंतर अमिताभ यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment