सिवनी- तब्बल २६ बछड्यांना जन्म देत पेंच व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीने जागतिक विक्रम बनवला आहे. नोव्हेंबर महिन्यात ४ बछड्यांना या वाघिणीने जन्म दिला आहे. रेडिओ कॉलर आईडी या वाघिणीला बसविण्यात आला असून ती कॉलरवाली या नावाने ओळखली जाते.
चक्क वाघिणीने बनवला जागतिक विक्रम
या वाघिणीचे १८ बछडे जीवंत असून ती १२ वर्षांची आहे. सर्वप्रथम तिने २००६ मध्ये ३ बछड्यांना जन्म दिला मात्र ती मृत्यूमुखी पडली. त्याच वर्षी तिने आणखी ४ बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर ५ बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर २ वेळा ३ बछड्यांना जन्म दिला. एप्रिल २०१५ मध्ये तिने ४ बछड्यांना जन्म दिला. त्यावेळी ती २२ बछड्यांची आई झाली होती. एकाचवेळी ५ बछड्यांना जन्म देण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे.