या सुंदरीच्या नखांची लांबी ६ इंच


षोडशवर्षीय तरूणींबाबत नक्की कधीच कांही सागता येत नाही कारण हे वय वेड वय म्हणून ओळखले जाते. प्रेमात पडणे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे दुसर्‍यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी चित्रविचित्र पोशाख करणे ही वेड्या वयाची सामान्य लक्षणे. मात्र जर्मनीच्या षोडशी सिमोन टेलरला सध्या एकाच वेडाने पछाडले आहे. तिला वेड लागलेय नखे वाढविण्याचे व त्यापायी गेल्या तीन वर्षात तिने नखे कापलेली नाहीत. यामुळे तिच्या नखांची लांबी ६ इंचांवर गेली आहे. या नखांसह बोटांचे फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत व नवल म्हणजे तिला हजारो फॉलोअर मिळाले आहेत.

सिमोन दिवसाच्या बराचसा वेळ या नखांची काळजी घेण्यासाठी घालविते. नेल आर्ट लावून त्यांचे फोटो काढते व ते इंस्टाग्रामवर टाकते. सुंदर नखांच्या अनेक स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. या महाप्रचंड नखांमुळे कॉलेजमध्ये नोटस घ्यायची वेळ आली तर तिची बोटे प्रचंड दुखतात तरीही नखे कापण्याचा तिचा कोणताही विचार नाही.

Leave a Comment