५०० वर्षांपूर्वी मृतदेहातून अजूनही निघते रक्त


न्यूयॉर्क: ५०० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीचे शव शास्त्रज्ञांना सापडले असून अजूनही तिच्या शरीरातून रक्त निघते. तसेच तिच्या रक्तामध्ये टीबीचे बैक्टेरिया देखील सापडल्यामुळे शास्त्रज्ञ देखील अचंबित झाले आहेत.

१९९१मध्ये तब्बल ५३०० वर्षांपूर्वीच्या एका माणसाचा मृतदेह ऑस्ट्रिया आणि इटलीदरम्यान आल्प्सच्या पर्वतरांगात आढळून आला होता. हा मृतदेह इतक्या वर्षांनीही बर्फात गाडले गेल्याने नैसर्गिकरीत्याच ममी बनून सुस्थितीत होता. त्याला ‘ओझी’ किंवा ‘आईसमॅन’ म्हटले जाते. १९९९मध्ये अर्जेंटिनातील एका ज्वालामुखीच्या ढिगार्‍यावर असाच एक सुस्थितीतील मृतदेह आढळला होता. असाच ५०० वर्षांपूर्वीचा एका पंधरा वर्षांच्या मुलीचा हा मृतदेह आढळला असून ही मुलगी नुकतीच मृत्यू पावली असावी म्हणून तो एवढ्या सुस्थितीत आहे. या मुलीच्या डोक्यावर घनदाट केस असून त्यामध्ये उवाही आहेत!

ही मुलगी ५०० वर्षांपासून ज्वालामुखीच्या राखेत दफन होती. ती राखेत दफन असली तरी तेथील तापमान अतिशय थंड होते आणि त्यामुळेच तिचा मृतदेह सुस्थितीत राहिला. तिच्या मृतदेहाबरोबर सोन्या-चांदीचे दागिने आणि काही मौल्यवान कपडेही मिळाले होते. यापेक्षाही आश्‍चर्याची बाब म्हणजे तिच्या शरीराची तपासणी झाली त्यावेळी तिच्या शरीरात रक्त आढळले आणि त्यामध्ये क्षयरोगाचे जंतूही अस्तित्वात होते.

तिच्या शरीरात ५०० वर्षानंतरही क्षयाचे जीवाणू कसे जिवंत राहिले हे आश्‍चर्यच आहे. यापूर्वी कोणत्याही ममीमध्ये असे बॅक्टेरिया आढळले नाही. या ममीच्या संशोधनातून अनेक गोष्टी उघड होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Leave a Comment