अवघ्या एका रुपयात मिळावा शाओमी रेडमी नोट ४


मुंबई: येत्या बुधवारी भारतात Mi Fan Festival चीनची मोबाईल उत्पादक कंपनी शाओमी आयोजित करणार आहे. या दरम्यान कंपनीने ६ एप्रिलला एक रुपयांच्या फ्लॅश सेलचे आयोजन केले आहे. याशिवाय अनेक डिव्हाईसवर डील आणि ऑफरही आहेत.

तुमच्याकडे एक रुपयाच्या फ्लॅश सेलमध्ये भाग घ्यायचा असल्यास शाओमीचे अॅप असणे गरजेचे आहे. बुधवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हा सेल आहे. यामध्ये तुम्ही रेडमी नोट ४, Mi बँड २ आणि १०००० एमएएच पॉवरबँक हे फक्त एक रुपयात खरेदी करु शकतात. याशिवाय ३ एप्रिल ते ५ एप्रिलदरम्यान दररोज सकाळी १० वाजेपासून ५० रु., १०० रु., २०० रु., आणि ५०० रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळवू शकतात. तसेच एसबीआयच्या डेबिट कार्डधारकांना ५०००च्या खरेदीवर ५ टक्के सूट मिळेल.

शाओमी रेडमी नोट ४चा देखील बुधवारी दुपारी १२ वाजता सेल होणार आहे. Mi फॅन फेस्टिव्हलमध्ये Mi इन इअर हेडफोन प्रो वर २०० रु. डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय या सेलमध्ये शाओमी Mi मॅक्स प्राइम स्मार्टफोन १९९९९ रुपयात उपलब्ध असणार आहे. हा फोन तुम्ही ईएमआयवर देखील खरेदी करु शकतात.

Leave a Comment