रिलायन्स जिओ आता करणार डिटीएच क्षेत्रात धमाका


नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर रिलायन्स जिओ IPTV सेट टॉप बॉक्सचे फोटो लीक झाले असून टेलीकॉम क्षेत्रात रिलायन्सच्या जिओने आल्या आल्याच चांगली पकड बसवल्यामुळे मोठमोठ्या टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, आता रिलायन्स डिटीएच क्षेत्रातही आपले पाय पसरवू पाहत आहे. जरी याची तारिख लाँच झाली नसली तरी आधीच रिलायन्स जीओच्या सेटटॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘कँडीटेक’ या बेवसाईटवर वेगवेगळ्या अँगलने काढलेले हे फोटो शेअर करण्यात आले आहे. निळ्या रंगाचा सेट टॉप बॉक्स असून त्यावर रिलायन्स जिओचा लोगोही आहेत. याआधीही रिलायन्स जिओच्या सेट टॉप बॉक्सचे फोटो व्हायरल झाले होत. रिलायन्स जिओ आता डिटीएच क्षेत्रात उतरणार म्हटल्यावर डिटीएच कंपन्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. अर्थात इतर कंपन्यांच्या डीटीएच सेवांवर याचा मोठा परिणाम होण्याची भिती कंपन्यांना आहे.

लाईव्ह स्टिमिंगची सुविधा तसेच ३५० चॅनेल रिलायन्स जिओ देणार असल्याचे समजते आहे. यातील ४८ चॅनेल हे एचडी असणार आहे. त्याचबरोबर यात ‘catch up’ हे नवे फिचर देखील असणार आहे. या फिचरच्या साह्याने ग्राहक सात दिवसांपूर्वीचे कार्यक्रमही पाहू शकणार आहे. दुसरं म्हणजे फक्त आवाज कमी जास्त करण्यासाठी आणि चॅनेल बदलण्यासाठी वापरण्यात येणा-या रिमोटचे स्वरूपच रिलायन्सने बदलले आहे. हा रिमोट स्मार्ट असून वॉईस सर्च कमांडच्या साह्याने चॅनल बदलता येणार असल्याचेही वृत्त आहे. रिलायन्सची जिओची ही डिटीएच सेवा इतर डिटीएच सेवांच्या तुलनेत अत्यंत अल्प दरात उपलब्ध होणार असल्याचे म्हटले जाते. या सेवांचे टेरिफ रेट हे इतरांपेक्षा निम्मे असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment