नवी दिल्ली – प्रतिदिनी १० जीबी डेटा देण्यास बीएसएनएल या कंपनीने प्रारंभ केला असून अनलिमिटेड ब्रॉडबॅन्ड ऍट २४९ या नावाने ही ऑफर सुरू करण्यात आली. यानुसार वापरकर्त्यांना प्रतिदिनी १० जीबी डेटा मिळणार आहे. यासाठी २४९ रुपये मासिक शुल्क द्यावे लागणार आहे.
२४९ रुपयांत बीएसएनएल देणार ३०० जीबी डेटा
ग्राहकांना डेटाच्या ऑफरव्यतिरिक्त रात्री ९ ते सकाळी ७ दरम्यान कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद कॉल करता येतील. रविवारी संपूर्ण दिवशी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्याद कॉलचा लाभ घेता येणार आहे. ब्रॉडबॅन्ड प्रकारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर सुरू करण्यात आली. स्वस्त दरात प्रतिदिनी १० जीबी डेटा देणारी बीएसएनएल ही देशातील पहिली कंपनी आहे, असे बीएसएनएलचे एन. के. गुप्ता यांनी म्हटले. बीएसएनएल ग्राहक केंद्रास भेट अथवा १८०० ३४५ १५०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले.