मेक इन इंडियाने चीनला टाकले मागे


युरोपिय संघ व जगातील ४९ बड्या देशांसंदर्भात जारी करण्यात आलेल्या मेड इन कंट्री इंडेक्स २०१७ मध्ये उत्पादनांचा दर्जा, गुणवत्ता याबाबतीत चीनला मागे टाकत भारताने ३६ अंक मिळविले आहेत. चीनला २८ अंक मिळाले आहेत. या यादीत १०० अंक मिळवून जर्मनी १ नंबरवर आहे तर स्वित्झर्लंड दोन नंबरवर आहे.

जगभराच्या बाजारात चीनने स्वस्त पण दुय्यम माल विकून आपली उत्पादन क्षमता सिद्ध केली असली तरी मालाची गुणवत्ता व दर्जा या बाबत भारत अधिक सरस आहे. स्टेटिस्टा ने आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था डालिया रिसर्च सह हे सर्वेक्षण केले. त्यात ४३०३४ ग्राहकांचे समाधान लक्षात घेतले गेले. युरोपिय संघातील ५० देश अशा सर्वेक्षणात जगातल्या ९० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतात. हे सर्वेक्षण करताना संबंधित देशात तयार होत असलेल्या मालाची गुणवत्ता, दर्जा, सुरक्षा मानके, किमत, वैशिष्ठ, डिझाईन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विश्वासार्हता, टिकाऊपणा, उत्पादनाच्या योग्य पद्धतींचा वापर व प्रतिष्ठा अशा अनेक बाबींवर ग्राहकांची मते नोंदविली गेली.

१९ व्या शतकात आज या यादीत नंबर १ वर असलेला जर्मनी नकली व कमी दर्जाच्या माल उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. आजच्या चीनप्रमाणेच त्यांची अवस्था होती. त्या काळात हा माल ब्रिटनला जात असे व परिणामी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे ब्रिटनने नकली मालापासून वाचण्यासाठी मेड इन लेव्हल सुरू केली होती. भारतात मोदींनी सत्तेवर येताच मेक इन इंडिया येाजनेला प्रोत्साहन दिले व त्याचाच परिणाम म्हणून आज भारत पाणबुडीपासून उपग्रहांपर्यंत निर्मितीत स्वयंपूर्ण झाला आहे. २०१४ मध्ये स्वदेशी बनावटीचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात स्थापित करणारा भारत हा पहिला देश होता.

Leave a Comment