वोडाफोन देणार केवळ ६ रुपयांत १जीबी ४जी डेटा


मुंबई – रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वात स्वस्त ४जी सेवा लाँच केल्यानंतर इतर कंपन्यांमध्ये एक वेगळीच स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन इंडियाने आपल्या ४जी डेटा प्लान्सची किंमत कमी करत खास ऑफर्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. वोडाफोनच्या नव्या प्लाननुसार, ४जी हँडसेट असलेल्या कस्टमर्ससाठी १जीबी डेटाच्या किमतीत १० जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.

सर्वच टेलिकॉम कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या विविध ऑफर्स बाजारात आणत आहेत. त्याचप्रमाणे टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या वोडाफोन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर बाजारात उपलब्ध करुन दिली आहे.

प्रीपेड ग्राहकांना वोडाफोनद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या ऑफरमध्ये ३५२ रुपयांत ५६ दिवसांसाठी दररोज १जीबी डेटा वापरण्यासाठी मिळणार आहे. या ऑफरची एक वेगळी गोष्ट अशी आहे की सर्व यूजर्ससाठी ही ऑफर उपलब्ध नाही. या ऑफरचा लाभ वोडाफोनच्या काही यूजर्सलाच घेता येऊ शकतो.

व्होडाफोनने दिलेली ऑफर घेण्यासाठी तुम्हाला माय वोडाफोन अॅप (My Vodafone App) डाऊनलोड करावा लागेल. या अॅपमध्ये जावून सर्वात खाली दिलेल्या ऑफर सेक्शनवर क्लिक करावे लागेल. जर तुम्हाला वोडाफोन ही ऑफर देत असेल तर तुमच्या मोबाइलच्या स्क्रिनवर ही ऑफर दिसेल.

Leave a Comment