जिओची कॅशबॅकच्या माध्यमातून मोफत प्राइम मेंबरशिप


मुंबई: ३१ मार्चनंतर रिलायन्स जिओची फ्री ऑफर बंद होणार असून जिओ १ एप्रिलपासून आपली सेवा देण्यासाठी यूजर्सकडून शुल्क आकारणार आहे. यूजर्सला प्राईम मेंबरशिपसाठी ९९ रुपये द्यावे लागणार आहेत. पण आता कंपनीने आपल्या यूजर्सला एक नवी भेट दिली आहे. आता जिओ यूजर्सला मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकते.

तुम्हाला हा फायदा रिलायन्स जिओच्या जिओ मनी (JIO MONEY) अॅपच्या ऑफरमध्ये मिळणार आहे. जिओने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन याबाबत माहिती दिली आहे. जिओ मनीवरुन रिचार्ज केल्यास यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर ५० रुपये कॅशबॅक मिळेल. तर प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला ९९ रुपये सब्सक्रिप्शन फी आणि ३०३ रुपये दर महिना शुल्क द्यावे लागेल.

९९ रुपये मेंबरशिप आणि ३०३ रुपयाचे टेरिफ रिचार्ज जर यूजर्सने केले तर या दोन रिचार्जवर (५०+५०) असे १०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. म्हणजेच तुमचे १०० रुपये तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणजे एका अर्थी तुम्हाला तुमची ९९ रु. मेंबरशिप परत मिळेल. ही कॅशबॅक ऑफर असल्याने तुम्हाला पहिले रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कंपनीची ही ऑफर यूजर्ससाठी चांगले डिल ठरु शकते.

Leave a Comment