झाकीर नाईक अडचणीत


स्वत:ला इस्लामचा प्रचारक म्हणवून घेऊन त्यासाठीच्या प्रवचनांतून कट्टरतावादाचा प्रचार करणारा मौलवी डॉ. झाकीर नाईक हा आता त्याच्यावरच्या या कट्टरतावादाच्या आरोपाखेरीज पैशाच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणातही सरकारच्या तावडीत सापडला असून त्याच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशन या संस्थेच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जायला लागला आहे. झाकीर नाईक हा पलायन करून अरबस्तानात लपला असला तरीही त्याच्या संस्था भारतातच आहेत आणि त्याचे काही नातेवाईक या संस्थांच्या आर्थिक गैरव्यवहारात गुंतले आहेत. त्यांना आणि नाईकच्या संस्थांवर आता अवैध सावकारीच्या आरोपांची चौकशी चालली असून या सावकारीच्या व्यवहारात त्याने २०० कोटी रुपयांची उलाढाल केली असल्याचे आढळून आले आहे.

त्याला येत्या ३० तारखेला दहशतवाद विरोधी कायद्याखाली तर न्यायालयात हजर होण्याचा आदेश देण्यात आला आहेच पण आता त्याच्या या अवैध सावकारीच्या प्रकरणात त्याच्या १८ कोटीच्या मालमत्तेवर टांच आणण्यात आली आहे. सध्या आपल्या देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. त्यामुळे एखाद्या इस्लामी संस्थेवर अशी कारवाई झाली की काही सेक्युलरवादी संघटना आणि पक्ष इस्लाम खतरेमे असल्याची बांग ठोकायला लागतात. इशरत जहान प्रकरणात या सेक्युलर खोटारड्यांनी मोदीला बदनाम करण्यासाठी किती छात्या पिटून घेतल्या होत्या हे आपण पाहिलेलेच आहे पण झाकीरच्या प्रकरणात अजून तरी एकही सेक्युलर बुद्धीमंत त्याच्या समर्थनार्थ समोर आलेला नाही कारण त्याच्या विरोधात सज्जड पुरावे आहेत. केवळ भारतातच नाही तर बांगला देश, ब्रिटन आणि कॅनडा याही देशांत त्याच्या व्याख्यानांवर बंदी आहे. इस्लाममध्ये व्याज घेणे वा देणे हे पाप मानलेले आहे. पण इस्लामचा हा धर्मप्रचारक अवैध सावकारी करीत आहे. म्हणजे त्याच्या प्रवचनात कुराणातल्या आयता आहेत पण वर्तनात मात्र इस्लामशी प्रतारणा आहे.

त्याचे विचार आयसिस आणि तालीबान या संघटनांशी मिळते जुळते आहेत. याचा अर्थ त्याला या विचारांचा प्रसार केल्याबद्दल त्यांच्याकडून भरपूर पैसा मिळत असणार. त्याला इंग्रजी चांगले येते आणि तो आपली प्रवचने इंग्रजीतून करून हजारो लोकांना मंत्रमुग्ध करतो पण आपल्या या कौशल्याचा वापर त्याने समाजात शांतता नांदावी यासाठी केलेला नसून देशाशी बेइमानी करण्यासाठी केला आहे. आता त्याला अरबस्तानात अज्ञात ठिकाणी तोंड लपवून बसावे लागत आहे.

Leave a Comment