एअरटेल देणार चक्क ३० जीबीचा ४ जी इंटरनेट डेटा मोफत


मुंबई: ग्राहकांची टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे मात्र चांगलीच चांदी होत असून ग्राहकांवर या कंपन्यांनी ऑफर्सचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली आहे. सध्या या ऑफरच्या सरीवर सरी कोसळत आहेत. आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर एअरटेलनेही आणली आहे. या ऑफरचे नाव ‘एअरटेल सरप्राईज ऑफर’ असे आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकाला चक्क ३० जीबीचा ४जी इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. ही ऑफर एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे.

एअरटेलची ‘सरप्राईज’ ऑफर मिळविण्यासाठी ग्राहकाला एअरटेलच्या माय एअरटेल अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ही ऑफर माय एअरटेलअ‍ॅपवर उपलब्ध आहे. तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक आहात आणि तुम्हाला ही ऑफर घ्यायची असेल तर, तुम्हाला माय एअरटेल अ‍ॅपवर जावे लागेल. या अ‍ॅपवर गेल्यावर अ‍ॅपमधील claim free data यावर क्लिक करा. तुम्हाला या ऑफरसंबंधी माहिती मिळेल तसेच, ही ऑफरही कार्यन्वीत करता येईल.

कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी या धमाकेदार ऑफरची माहिती देण्यासाठी एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये दिली आहे. गोपाल विठ्ठल ईमेलमध्ये म्हणतात, एअरटेल हे भारतातील सर्वात जलद नेटवर्क आहे. आमच्या नेटवर्कचा स्पीड जगभरात सर्वात जलद असल्याचा किताब आम्हाला ओकोला या स्पीड टेस्ट कंपनीने दिला आहे. ग्राहकांशिवाय आमचा आनंद हा अपुरा असून, त्यासाठी आम्ही आमच्या पोस्टपेड ग्राहकांचे आभार मानतो.

Leave a Comment