कॅशलेस देवघेवीचे शरद पवारांकडून कौतुक


राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी मंत्री शरद पवार यांनी कॅशलेस व्यवहारांचे कौतुक करताना या योजनेमुळे रोजच्या जीवनातले अवाजवी खर्च कमी होण्यास मदत झाल्याचे व व्यवहारातील पारदर्शकता वाढल्याचे मत व्यक्त केले. यूआयडीएआयचे माजी अध्यक्ष नंदन नीलेकणी यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. निलेकणी यांचा रविवारी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार२०१६ देऊन सन्मान केला गेला.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या नोटबंदी व कॅशलेस सिस्टीम निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले डेबिट कार्ड असूनही अनेकदा रोख पैसे नसतात व अशावेळीही बायका नवर्‍यांना कार्ड ठेवा असा सल्ला देतात. ग्रामीण भागात कार्डचा वापर अजून पुरेसा वाढलेला नाही मात्र इलेकट्रॅनिक ट्रान्सफर सिस्टीम मात्र तेथे चांगली रूजते आहे. भविष्यात सगळेच व्यवहार कॅशलेस होणार आहेत. याचा मुख्य फायदा अनावश्यक खर्चाला आळा घालण्यात व व्यवहारातील पारदर्शकता वाढविण्यात होणार आहे.

Leave a Comment