मुंबई – काल देशभरात होळीचा उत्सव साजरा झाल्यानंतर आज रंगपचमी सगळीकडे आनंदात साजरी होणार आहे. होळीच्या रंगात अनेक जण न्हाऊन निघणार आहे. भारतीय लोक वेगवेगळ्या देशात होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलने स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसोबत होळी खेळली आहे. आज गुगलचे पेज ओपन केल्यानंतर रंगात न्हाऊन निघालेले डुडल आपल्या नजरेस पडते. या डुडलमधून गुगलवर लहानग्यांची टोळी रंगांची उधळण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लहानग्यांसोबत गुगलने साजरी केली होळी
या डुडलचा एक व्हिडीओही व्हायरल गुगलकडून करण्यात आला आहे. त्यात सर्वांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. व्हिडीओत लिहिले आहे की, आम्ही होळीच्या शुभेच्छा देत आहोत, हिंदूंचा होळीचा सण भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या उत्साहास साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला २०१७ या वर्षांत प्रेम आणि शांती नांदत राहण्याच्या शुभेच्छा देतो.
तत्पूर्वी भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, प्रमुख सण, घटना, व्यक्ती यांना गुगलने नेहमीच विशेष डुडलच्या माध्यमातून सन्मान दिला गेला होता. या अगोदर अनेकदा गुगलने डुडल सादर करून उत्सावात भर पाडली आहे.