१० हजारांनी स्वस्त झाला आयफोन ७ आणि ७ प्लस!


मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनने अॅपलचा नवा स्मार्टफोन आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आणली आहे. ग्राहकांना या ऑफरमध्ये थेट १० हजार रुपयांची सूट मिळणार आहे. फ्लिपकार्टने मागील आठवड्यात अशीच सूट दिली होती. त्यानंतर आज अमेझॉनने त्यापेक्षाही अधिक सूट दिली आहे.

या सेलमध्ये आयफोन ७ आणि ७ प्लससोबत आयफोन ६चा ३२ व्हेरिएंटचीही विक्री सुरु आहे. आयफोन ७ ३२जीबी स्मार्टफोनवर १० हजारांची सूट देण्यात आली असून आता हा स्मार्टफोन ४९,९९९ रुपयात मिळणार आहे. या स्मार्टफोनची सध्याची किंमत ६०,००० रुपये आहे.

आयफोन ७ १२८ जीबी स्मार्टफोन फक्त ५९,९९९ रुपयात मिळणार आहे. ज्याची किंमत ७०,००० रुपये आहे. आयफोन ७ २५६जीबी स्मार्टफोनवर देखील १० हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन ७०,२१५ रुपयात उपलब्ध आहे. सध्या याची किंमत ८०,००० रुपये आहे. आयफोन ७ प्लस ३२ जीबी स्मार्टफोनवर १० हजारांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन आता ६१,९९९ रुपयात मिळणार आहे. या स्मार्टफोनची सध्याची किंमत ७२,००० रुपये आहे. आयफोन ७ प्लस १२८ जीबी स्मार्टफोन ७१,९९९ रुपयात मिळणार आहे. ज्याची किंमत ८२,००० रुपये आहे. दरम्यान या सेलमध्ये आयफोन ७ प्लसच्या २५६ जीबी स्मार्टफोनवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.

Leave a Comment