जिओचाच इंटरनेट स्पीड ‘लय भारी’


मुंबई : रिलायंस जिओचे सिम वापरतांना आतापर्यंत ग्राहकांना इंटरनेटचा स्पीड कमी मिळत असल्याची सगळ्यांचीच तक्रार होती. पण आता असे होणार नाही. कारण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रिलायंस जिओच्या नेटवर्कवर आता डाउनलोड स्पीड दुप्पट झाला आहे. आता १७.४२ मेगाबाईट प्रती सेकंड (एमबीपीएस) जिओचा डाउनलोड स्पीड झाला असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने दिली आहे. तर डाउनलोड स्पीडच्या बाबतीत आयडिया दुसऱ्या तर एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ट्रायने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये जानेवारीमध्ये जिओच्या नेटवर्कची डाउनलोड स्पीड १७.४२ मेगाबाईट झाला असून डिसेंबरच्या शेवटपर्यंत तो ८.३४ मेगाबाईट होता. या स्पीडमध्ये एखादा चित्रपट ३० मिनिटांच्या आता डाऊनलोड केला जाऊ शकतो असे म्हटले आहे.

८.५३ एमबीपीएससह आयडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर एअरटेल नेटवर्कचा डाऊनलोड स्पीड ८.४२ एमबीपीएसवरुन ८.१५ एमबीपीएसवर आला आहे. वोडाफोन नेटवर्कवर डाऊनलोड स्पीड ६.८ एमबीपीएसहून ६.१३ एमबीपीएस झाला आहे. बीएसएनएलचा डाऊनलोड स्पीड ३.१६ एमबीपीएसवरुन २.८९ एमबीपीएस झाला आहे.

Leave a Comment