पॅरिसच्या या रम्य कालव्यातून निघाल्या धक्कादायक वस्तू


सिटी ऑफ लव्ह अशी ओळख असलेल्या पॅरिसमधील सेंट मार्टिन कालव्याची साफसफाई केली जात असून या कालव्यातून निघालेल्या अनेक विविध वस्तू पाहून सफाई कर्मचारी अवाक झाले आहेत. थकल्या भागल्या जीवांना चार घटका निवांत बसता यावे, विरंगुळा मिळावा यासाठीचे हे शहरातील बेस्ट ठिकाण मानले जाते. हा कालवा २००१ साली साफ केला गेला होता. त्यानंतर आता तो १६ वर्षांनंतर पुन्हा साफ केला जात आहे. मात्र या सोळा वर्षात या कालव्याने काय काय पोटात घेतले ते पाहून लोक आश्चर्याने थक्क होत आहेत.


साफसफाईसाठी या कालव्यातील पाणी प्रथम कमी केले गेले तेव्हा त्यात दडलेल्या खजिन्याचे हळूहळू दर्शन होऊ लागले. लहान मोठ्या आकाराचे अनेक मासे येथे सापडलेच पण त्याचबरोबर शॉपिंग करताना वापरायच्या ढकलगाड्या, सायकली, स्कूटर, इमारतीचे भाग, जुन्या बॅगा, बियरच्या शेकडो बाटल्या असाही खजिना येथे सापडला. आपण भारतीयांना कुठेही कांहीही टाकण्याबाबत तप्तर समजतो पण फ्रान्सचे नागरिकही या बाबतीत भारतीयांच्या तोडीस तोड असल्याचे या प्रकारातून दिसून आले आहे.

Leave a Comment