एअरटेल-नोकियाची ५जी सेवा देण्यासाठी हातमिळवणी


नवी दिल्ली – ५जी सेवा देण्यासाठी मोबाईल निर्माती कंपनी नोकिया आणि भारतातील अग्रगण्य टेलीकॉम कंपनी एअरटेल यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि ५जी टेक्नॉलॉजी आणण्यासाठी या दोघांनी करार केला आहे.

याबाबत माहिती देताना भारती एअरटेलचे संचालक (नेटवर्क सेवा) अभय सावरगावकर म्हणाले, ५जी आणि आयओटी अॅप्लिकेशन तंत्रज्ञानामध्ये जीवन बदलवण्याची क्षमता असून भविष्यातील या तंत्रज्ञानाला नोकियासोबत काम करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

५जी मुळे हायस्पीड डेटा देता येईल तसेच या सेवेमुळे नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल, असे एअरटेलने सांगितले. एअरटेलसोबत काम करून २जी, ३जी आणि ४जी सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर आता ५जी ची घोषणा करणे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असल्याचे नोकियाचे भारताचे मार्केटिंग हेड संजय मलिक म्हणाले.

Leave a Comment