‘व्हॉट्सअॅप’देखील होणार ‘पारदर्शक’ !


मुंबई : राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पारदर्शकता’ हा मुद्दा फार चर्चेत होता. पण हाच मुद्दा सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या व्हॉट्सअॅपने भलताच गांभिऱ्याने घेतला आहे. आपल्या नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅपने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्टेटस नावाचा नवा ऑप्शन व्हॉट्सअॅपने आता यूजर्सना दिला आहे. या स्टेटसमध्ये तुम्हाला फोटो ठेवून यावर कॅप्शन लिहिता येणार आहे. तुमचा हा फोटो आणि कॅप्शन कोणी बघितले हे आता तुम्हाला कळणार आहे. तुमचे हे स्टेटस २४ तासांसाठी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाहता येणार आहे.

Leave a Comment