नोकियाच्या ३३१० फोनची नवी आवृत्ती लाँच


बार्सिलोना – पुन्हा एकदा बाजारात एकेकाळची अव्वल कंपनी नोकियाने पदार्पण केले. रविवारी बार्सिलोनामध्ये मोबाइल वर्ल्ड काँग्रेस-२०१७च्या प्री-इव्हेंटमध्ये कंपनीने पहिला फाइव्ह-जी मोबाइल लाँच केला. याचे नोकिया-३, नोकिया-५ व नोकिया-६ मॉडेल्स सादर करण्यात आले. कंपनीचे हे पहिले अँड्रॉइड फोन्स आहेत. तब्बल १७ वर्षांनंतर नोकियाने फीचर फोन ३३१० रिलाँच केला. २२ तास व स्टँडबाय १ महिन्याचा याचा टॉकटाइम आहे. कंपनीने या प्रसिद्ध मॉडेलची जगभरात विक्रमी म्हणजे १२.६० कोटी फोनची विक्री केली होती. यामध्ये २.५ जीची नेट कनेक्टिव्हिटी व २ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि स्नेक गेमही आहे. किंमत ३६०० रुपये आहे. भारतात स्मार्टफोनपेक्षा फीचर फोन अधिक विकले जातात. त्यामुळे कंपनीचे भारतीय बाजारपेठेवर लक्ष आहे.

Leave a Comment